दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या नजरा आता निकालाकडे लागल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अद्याप निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या निकालाची तयारी करण्यात येत. पेपर तपासणी अंतिम टप्प्यात आहे. दहावी आणि बारावीच्या निकालाची संभाव्य तारीख समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बारावी आणि दहावीचा निकाल गत वर्षी पेक्षा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर होऊ शकतो. तर दहावीचा निकाल त्यानंतर १० दिवसांत लागू शकतो.
विद्यार्थी आणि पालकांकडून निकालाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. लवकरच बोर्डाकडून निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात येणार आहे. दहावी आणि बारावीचा निकाल mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर आणि आईचे नाव टाकावे लागेल.
११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ यादरम्यान महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षा झाल्या होत्या. १५ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. मे महिन्याच्या सुरूवातीला १२ वीचा निकाल लागू शकतो. निकाल ऑनलाइन जाहीर करण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचे समजतेय. निकाल ऑनलाईन कसा पाहाल?
Steps to Check Maharashtra Class 12th Result Online
- mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in. संकेतस्थळावर जा
- “एचएससी/एसएससी परीक्षा निकाल 2025” या लिंकवर क्लिक करा.
- आसन क्रमांक आणि तुमच्या आईचे नाव टाका.
- ‘निकाल मिळवा’ या बटणावर क्लिक करा.
- तुमचा निकाल विषयानुसार तपशीलवार गुणांसह प्रदर्शित होईल.
- निकालाची प्रत डाउनलोड करा किंवा प्रिंट करा.