इचलकरंजी येथील फौजदारी न्यायालयाने मद्यपान करू वाहन चालवल्याबद्दल अर्जुन योगराज गोसावी (वय ३७, रा. कोल्हापूर) यास १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. अर्जुन गोसावी हे रस्त्याची परिस्थिती न पाहता आपल्या दुचाकीवरून वाकडे तिकडे जाताना २३ मे २०२४ रोजी इचलकरंजीतील डेक्कन रोडवर वाहतुक पोलीस वसंत पाटील यांना मिळून आला होता.
मशीनवर तपासणी केली असता त्यांनी अल्कोहोल सेवन केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे पंचनामा करून गोसावी याच्या विरोधात फिर्याद दिली होती. त्याची सुनावणी झाली. यामध्ये गोसावी यांनी मद्यपान करत वाहन चालवल्याचे सिद्ध झाल्याने न्यायालयाने १० हजार रुपये दंड ठोठावला आहे. सरकार पक्षच्यावतीने विशेष सरकारी वकील सूर्यकांत मिरजे यांनी काम पाहिले.