इचलकरंजीत १ ते १० मे शाहिरी प्रशिक्षण शिबिर! नोंदणी सुरू

प्रबोधन शाहिरी कलापथकाच्या वतीने १ ते १० मे या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी शाहिरी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. शिबिरात समाजप्रबोधनपर, व्यसनमुक्ती, समूहगीत, अंधश्रद्धा, साक्षरता, वृक्षसंवर्धन गाणी, पोवाडे आदी ज्येष्ठ शाहिरांच्या मार्गदर्शनाखाली शिकविण्यात येणार आहे.इयत्ता पाचवीच्या पुढील विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी होता येईल.

शाहीर हिंदुराव लोंढे व शाहीर संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर होणार आहे. विनायक हायस्कूल (शहापूर) येथे ८.३० ते १.३० या कालावधीत हे शिबिर होणार आहे. नाव नोंदणीसाठी २५ एप्रिल अंतिम मुदत आहे.