गुरुकुलांचं आधुनिक युग, गरीब मुलांच्या जीवनातील बदलासाठी पतंजलीच्या शिक्षणविषयक योजना

योग गुरु बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या पतंजली आयुर्वेदकडून योग आणि आयुर्वेद यासह आता शिक्षण क्षेत्रात काम सुरु करण्यात आलं आहे. पतंजलीच्या शिक्षण विषयक योजनांमुळं गुरुकुलांचं नवं युग सुरु झालं आहे. पतंजली च्या शिक्षण योजनांमुळं देशातील गरीब मुलांचं आयुष्य बदलत आहे. पतंजलीच्या आचार्यकुलम गुरुकुलम आणि पतंजली विद्यापीठ गरीब मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी काम करत आहे.

या शाळांमध्ये मुलांना वेद आणि भारतीय संस्कृतीसह आधुनिक विषय शिकवले जातात. हरिद्वारमध्ये आचार्यकुलम हे सीबीएसई मान्यताप्राप्त शाळा असून 5 ते 12 वी पर्यंतचं शिक्षण दिलं जातं. मुलांना चांगल्या शिक्षणासह नैतिक मुल्यांचं शिक्षण दिलं जात. गुरुकुलममध्ये भारतीय संस्कृती आणि वेदांसह आधुनिक शिक्षणावर जोर दिला जातो.

भारतात 500 शाळा काढण्याचं उद्दीष्ट

पतंजलीनं त्यांच्या सामाजिक दायित्व कार्यक्रमांद्वारे गरीब मुलांना मुलांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी काही पावलं उचलली आहेत. आचार्यकुलम सारख्या शाळांवर मोठा खर्च केला असून संपूर्ण भारतात 500 शाळा सुरु करण्याचं ध्येय आहे. यामुळं गरीब मुलांना परवडणारं आणि चांगलं शिक्षण मिळेल. पतंजलीचा शिक्षण विषयक कार्यक्रम केवळ मुलांना शिक्षित करत नाही तर त्यांना समाजासाठी योगदान देण्यासाठी प्रेरित करतो.

शिक्षण क्षेत्रात बदल करण्यासाठी प्रयत्न : स्वामी रामदेव

पतंजलीच्या 30 व्या स्थापना दिवशी संस्थापक स्वामी रामदेव यांनी त्यांचा उद्देश शिक्षण क्षेत्रात बदल करणं हा आहे, असं म्हटलं. गरीब मुलांना चांगलं शिक्षण देऊन त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यात मदत केली जाईल. पतंजलीचा हा प्रयत्न गरीब मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल आणण्याच्या दिशेनं टाकलेलं एक मोठं पाऊल आहे. हा उपक्रम मुलांना शिक्षणासह समाजाच्या प्रती जबाबदारीची जाणीव करुन देत राहील.