उद्या इचलकरंजी येथील श्री सद्गुरु संत महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालाजी शिक्षण समूहाचा रौप्य महोत्सव संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम शनिवारी सकाळी दहा वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे माजी आरोग्य मंत्री आमदार राजेश टोपे आणि माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
यावेळी अनेक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले. याची माहिती बालाजी शिक्षण समूहाचे अध्यक्ष मदन कारंडे यांनी दिली. बालाजी शिक्षण समूहाची स्थापना सन 1999 मध्ये झाली आणि या बालाजी शिक्षण समूहाने शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी देखील घेतली आहे. तसेच आगळावेगळा ठसा देखील उमटवला आहे.