पदवी मिळाली आता नोकरीच्या शोधात आहात? हा कोर्स तुमच्यासाठी ठरू शकतो उत्तम पर्याय……..

अनेकदा चांगले शिक्षण घेऊनही बहुतेक जण नेहमी रोजगाराच्या शोधात जगात असतात. बहुतेक जण पदवीधर तर होतात, परंतु त्याचा काही फारसा चांगला फायदा होताना दिसत नाही.

पदवीधर होऊन बरीचशी मंडळी घरामंध्ये बसलेली आढळतात. यामुळे देशामध्ये बेरोजगारीची संख्या वाढत चालली आहे. यामध्ये बहुतेक मंडळी तीच आहेत, ज्यांनी आपल्या शिक्षणासाठी लाखो रक्कमेची आहुती दिली, परंतु हाती रोजगार काही सापडेना. हे खरे आहे कि, काम मिळत नसते ते शोधावे लागते.

आजच्या स्पर्ध्येच्या युगात स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी उमेदवारांकडे काही कौशल्य असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे काही कौशल्य असतील तर त्या कौशल्यांचा जोरावर फार उंचावर जाऊ शकता. जर नसतील तर असे काही सर्टिफिकेट कोर्स आहेत, जेणेकरून तुम्ही ६ महिन्यांच्या आतमध्ये नोकरी मिळवू शकता.

डिजिटल मार्केटिंग हा आज सर्वात वेगाने वाढणारा उद्योग आहे. या कोर्समध्ये तुम्हाला एसइओ, सोशल मीडिया मार्केटिंग, कंटेंट मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग आणि गुगल ॲनालिटिक्स सारखी कौशल्ये शिकवली जातात. ६ महिन्यांचा डिजिटल मार्केटिंग कोर्स तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही क्षेत्रात चांगल्या संधी देऊ शकतो.

या कोर्सनंतर तुम्ही डिजिटल मार्केटर, सोशल मीडिया मॅनेजर किंवा एसइओ स्पेशलिस्ट सारख्या पदांवर नोकरी मिळवू शकता. तुमच्याकडे चांगली सर्जनशीलता असेल आणि तुम्हाला डिझायनिंगची आवड असेल, तर ग्राफिक डिझाईनमधील सर्टिफिकेट कोर्स तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

या कोर्समध्ये तुम्हाला Photoshop, Adobe Illustrator आणि इतर डिझायनिंग टूल्सबद्दल शिकवले जाते. या कोर्सनंतर तुम्हाला ग्राफिक डिझायनर, UI/UX डिझायनर किंवा क्रिएटिव्ह डायरेक्टर सारखी नोकरी मिळू शकते.