इचलकरंजी रनर्स फौडेशन आयोजित आयएमफिट क्लब इचलकरंजी हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन रविवार २४ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. स्पर्धेचे यंदाचे पाचवे वर्ष आहे. ५ कि. मी., १० कि. मी. व २१ कि. मी. अशा तीन विभागात घेतल्या जाणाऱ्या स्पर्धे साठी २५०० स्पर्धकांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती अध्यक्ष महेश शेळके यांनी दिली.
रविवारी पहाटे साडेपाच वाजता होणार असून सहा वाजता राजवाडा येथून स्पर्धेची सुरुवात होणार आहे. स्पर्धेचा मार्ग राजवाडा, गांधी पुतळा, मलाबादे चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, एएससी कॉलेज कबनू र चौक, व्यंकटेश्वरा स्कूल, नवमहाराष्ट्र सूतगिरणी साजणी बिर्ला राईस मिल ते परत राजवाडा डीकेटीई असा असणार आहे.
मार्गावर अलायन्स हॉस्पिटल व डॉक्टर अनिकेत पोतदार तर व्हेंटिलेटरचे नियोजन गोरखनाथ सावंत, उदय मेटे , अभिजीत मांगलेकर, विनायक खोत करणार आहेत. यावेळी संतोष शेळके, नितेश पाटनी, गोरखनाथ सावंत, सुमित लाहोटी, उदय मेटे, महेंद्र जैन, अशोक बांगड, विनायक खोत, स्वप्निल माने, रमेश पारिख, संदीप मोघे, भारत केटकाळे उपस्थित होते.