बजाज फायनान्सची 10 लाख रुपयांची फसवणूक……

हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील लकी फर्निचरच्या माध्यमातून ग्राहकांच्या नावे बोगस कर्जप्रकरणे मंजूर करून बजाज फायनान्सची 10 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फायनान्स कंपनीचा सेल्स एक्झिक्युटिव्ह व लकी फर्निचरच्या मालकासह 32 ग्राहकांविरोधात हुपरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बजाज फायनान्स कंपनीचे सेल्स एक्झिक्युटिव्ह आकाश राजेंद्र गणपते (वय 25, रा. मुसळे गल्ली, षटकोन चौक, इचलकरंजी), लकी फर्निचरचा मालक लखन राजेंद्र कोळी (वय 24, रा. सलगरा दिवटी, ता. तुळजापूर, जि. धाराशीव) तसेच फर्निचर शो रूमबरोबर साहित्य खरेदीसाठी करारबद्ध असलेला परशुराम बागडी (रा. वाळवेकरनगर, हुपरी) यांच्यासह इचलकरंजी व हुपरी परिसरातील 29 ग्राहकांचा समावेश आहे.

अपहारप्रकरणी बजाज फायनान्सचे रिस्क मॅनेजर राहुल बसवाणी हसबे (वय 34) यांनी आज 32 जणांविरोधात हुपरी पोलिसांत गुन्हा दाखल केला. यामध्ये इचलकरंजीतील 24, हुपरीतील 4, रेंदाळच्या एका ग्राहकाचा समावेश आहे.