इचलकरंजीची विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी रवींद्र माने यांना आग्रह…..

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून रवींद्र माने दादा तुम्ही अर्ज दाखल करा तुमच्या पाठीशी आम्ही आहोत ताईंचा आशीर्वाद आजच घ्या विधानसभेत तुम्ही आमचा आवाज ठराल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ द्या शहराच्या विकासाला चालना द्या असे मत इचलकरंजी शहरातील रक्षाबंधनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात महिलांनी व्यक्त केलेला आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांना महिलांनी राखी बांधली. त्यावेळेस महिलांनी रवींद्र माने यांना इचलकरंजीची विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आग्रह देखील केला.

दरम्यान रवींद्र माने म्हणाले की, बहिणींची मला साथ मिळाली त्यांनी आशीर्वाद दिला आहे. नक्कीच मी याचा विचार करेन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खास. धैर्यशील माने जो निर्णय घेतील त्या निर्णयाचे मी सोने करेन.