मीठाशिवाय जेवणाची चव चांगली लागत नाही. मीठ केवळ अन्नाची चव वाढवत नाही तर शरीरात आयोडीनची कमतरता देखील भरून काढते. पण आपल्यापैकी काही लोकांना जास्त मीठ खाण्याची सवय असते. पण ही सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. ज्याप्रमाणे पोषक तत्वांच्या कमतरतेचा आरोग्यावर परिणाम होतो, त्याचप्रमाणे शरीरात त्यांच्या वाढत्या प्रमाणाचाही परिणाम होतो.
आहारतज्ज्ञ मोहिनी डोंगरे सांगतात की लोकांना काही पदार्थांमध्ये मीठ टाकून त्याचे सेवन करतात. पण आपल्या आरोग्याशी संबंधीत असे काही पदार्थ असतात ज्यामध्ये वरून मीठ टाकून खाऊ नयेत असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण पदार्थांमध्ये वरून मीठ टाकून त्याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. तर आजच्या या लेखातून आपण याबाबतीत आहारतज्ज्ञाकडून जाणून घेऊया …
फळांचे ज्यूस
लोकांना अनेकदा उसाचा रस आणि मौसंबीचा ज्यूस यामध्ये मीठ टाकून प्यायला आवडते. मात्र आरोग्याच्या दृष्टीने या ज्यूसमध्ये मीठ टाकून प्यायल्याने आपल्याला त्याचे पोषक घटक मिळत नाहीत. तसेच शरीरात मीठाचे प्रमाण वाढते. विशेषतः फळांच्या ज्यूसमध्ये मीठ टाकून पिऊ नका, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
फ्रूट चाट
तज्ज्ञ सांगतात की फ्रूट चाट घात असताना सुद्धा मीठ घालून खाऊ नये. जर तुम्ही फळांवर मीठ घालून खाल्ले तर शरीरात पाणी टिकून न राहण्याची समस्या उद्भवू शकते. यामुळे शरीरात जळजळ होऊ शकते. तसेच फ्रूट चाटवर वरून मीठ टाकून खाल्ल्याने रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे मीठाचे जास्त सेवन करू नये.
सॅलड
अनेकांना सॅलडमध्ये मीठ टाकून खायला आवडते. पण यामुळे शरीरात सोडियमची पातळी वाढू शकते. सॅलड खाल्ल्याने शरीराला फायबर आणि पाण्याचे प्रमाण मिळते. पण तुमच्या आहारात जेव्हा सॅलडचे समावेश करून त्यावर मीठ टाकून खाल्ल्याने शरीरात समस्या उद्भवू शकते. विशेषतः, कच्च्या भाज्यांमध्ये मीठ टाकून खाऊ नका.
मर्यादित प्रमाणात मीठाचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की चिप्स, नूडल्स आणि इतर जंक फूडमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, ते न खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.