सांगोल्यात दुय्यम निबंधक यांची फसवणूक! चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जमीन मालक मयत असल्याचे माहित असताना तोतया व्यक्ती उभी करून खोटी निवेदन ओळखपत्र तयार करून दस्त खरेदी विक्री करून सदरचा दस्ताच्या आधारे जाणीवपूर्वक माहिती असताना देखील दस्ताच्या आधारे पुढे मिळकतीची विक्री करून सांगोला येथील दुय्यम निबंधक यांची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे.

बाबुराव भोसले यांची एखतपुर हद्दीत 91 आर जमीन आहे बाबुराव भोसले हे 23 मार्च 2000 रोजी मयत झाले असतानाही तोतया जमीन मालक उभा करून वरील चार जणांनी परस्पर ९१ आर जमीन विक्री करून प्रस्तुतचा दस्त हा बनावट असल्याचे माहिती असून देखील अन्य इसमाबरोबर खरेदी विक्री व्यवहार केला आहे.

तसेच तक्रारी अर्जाचे अनुषंगाने संबंधित ग्रामपंचायत कार्यालय एखतपुर तालुका सांगोला यांच्याकडे पत्रव्यवहार करून बाबुराव भोसले यांचे मृत्यूचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने बाबुराव भोसले राहणार एखतपूर तालुका सांगोला हे मयत असल्याचे माहित असताना देखील तो त्या व्यक्ती उभी करून खोटी निवेदन, बनावट ओळखपत्र तयार करून सदरच्या दस्ताच्या आधारे जाणीवपूर्वक माहिती असताना देखील दस्ताच्या आधारे पुढे मिळकतीची विक्री केलेली आहे.

म्हणून सहाय्यक निबंध यांनी चार जणांविरुद्ध नोंदणी अधिनियम 1908 मधील कलम 82 चा भंग केला म्हणून सांगोला पोलिसात गुन्हा नोंद केला आहे.