विट्यासह खानापूर तालुका हादरला!

चिंचणी मंगरूळ येथील सतीश शेठ निकम यांच्या मातोश्री असणाऱ्या सखुबाई संभाजी निकम वय 80 यांचा घरगुती वादातून खून झाल्याची खळबळजनक घटना आज समोर आलेली आहे. हा खून त्यांच्या सुनेसह नातवंडाकडून झालेला उघडकीस आलेला आहे.

चिंचणी मंगरूळ येथे रहिवाशी असणाऱ्या सखुबाई संभाजी निकम यांचा त्यांच्याच नातू असणाऱ्या यश सतीश निकम आणि आशिष सतीश निकम आणि सून रेणुका सतीश निकम यांचा जमिनीच्या विषयातून वाद सुरू होता. त्यामुळे सखुबाई या आपल्या मुलीकडे म्हणजेच पारे येथे आलेल्या होत्या.

यानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास चिंचणी मंगरूळ येथील त्यांचे नातू यश सतीश निकम आणि आशिष सतीश निकम यांनी एका महिलेच्या साह्याने घरात येऊन सखुबाई निकम यांचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना आज उघडकीस आली. या घटनेमुळे पारे गावासह पूर्ण खानापूर तालुका हादरला आहे. यानंतर विटा पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करण्याची यंत्रणा लावण्यात आलेली आहे.