ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानने (Pakistan) लढाईत तुर्की निर्मित ड्रोनचा वापर केला. पण भारतीय सैन्याने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत हे ड्रोन पाडले. या संघर्षात भारतीय सैन्याने ड्रोनचाही वापर केला. या ड्रोनच्या मदतीने भारताने पाकिस्तानचे मोठे नुकसान केले. भारतात अनेक कंपन्या ड्रोन बनवतात. या संघर्षातनंतर भारतीय ड्रोन उत्पादक कंपन्यांचे शेअर्स वाढू लागले आहेत. शुक्रवारी दोन प्रमुख कंपन्यांच्या शेअर्सला अप्पर सर्किट लागले.
झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड या दोन प्रमुख कंपन्या केवळ ड्रोनचे उत्पादन करत नाहीत तर संबंधित सेवा देखील प्रदान करतात. शुक्रवारी झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेडने ५% चे अप्पर सर्किट गाठले. त्याच वेळी पारस डिफेन्सचा शेअर देखील २० टक्क्यांच्या अप्पर सर्किटच्या जवळ पोहोचला.
शुक्रवारी झेन टेक्नॉलॉजीजचा शेअर्स १७९४.७५ रुपयांवर बंद झाला. गेल्या काही दिवसांपासून हा शेअर्स वाढत आहे. या आठवड्यात सोमवार ते शुक्रवार या कालावधीत शेअर २१ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. एका वर्षातही या शेअर्सने गुंतवणूकदारांना सुमारे ९० टक्के परतावा दिला आहे.
त्याच वेळी शुक्रवारी पारस डिफेन्सच्या शेअर्समध्येही मोठी वाढ दिसून आली. हा शेअर्स देखील २० टक्क्यांच्या अप्पर सर्किटच्या जवळ पोहोचले. शेअर्स १८.९०% वाढीसह १८००.१० रुपयांवर बंद झाला. गेल्या काही दिवसांपासून या शेअर्समध्येही वाढ झाली आहे. या आठवड्यात शेअर २८ टक्क्यांनी वाढला आहे. तर गेल्या एका महिन्यात त्यात सुमारे ७४ टक्के आणि एका वर्षात १५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
शुक्रवारी शेअर बाजार कोसळत असताना या कंपन्यांच्या शेअर्सनी अप्पर सर्किटला धडक दिली. शुक्रवारी सेन्सेक्स २००.१५ अंकांच्या घसरणीसह २५,०१९.८० वर आणि निफ्टी ४२.३० अंकांच्या घसरणीसह २५,०१९.८० वर बंद झाला. ऑटो, पीएसयू बँका, एफएमसीजी, रिअल्टी, मीडिया, ऊर्जा आणि खाजगी बँकांचे शेअर्स वधारले. आयटी, फायनान्शियल सर्व्हिसेस, फार्मा आणि मेटलचे शेअर्स घसरून बंद झाले.