मेंढपाळांना आ. गोपीचंद पाडळकरांचा दिलासा

महाराष्ट्र राज्यातील मेंढपाळ बांधवांसाठी दिलासादायक निर्णय जाहीर झाला असून वन विभागाकडून चराईसाठी मेंढयांवर आकारली जाणारी फी रद्द करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनात मेंढपाळांच्या प्रश्नांना जोरकसपणे वाचा फोडणारे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आहे. यापूर्वी वन विभागाकडून प्रति मेंढी ५० रुपये व पिकाला १५ रुपये अशी चराई फी आकारली जात होती . मात्र आमदार पडळकर यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे पाठपुरावा करत या अन्यायकारक शुल्काविरोधात ठाम भूमिका घेतली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे ही शुल्क आकारणी रद्द करण्यात आली असून यापुढे मेंढपाळांकडून कोणतीही चराई फी घेतली जाणार नाही . अशी माहिती भाजप आटपाडी तालुकाध्यक्ष दादासो हुबाले यांनी दिली. या निर्णयामुळे राज्यातील तमाम मेंढपाळ समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा निर्णय केवळ आर्थिक दिलासा नसून एक प्रकारे मेंढपाळांच्या वर्षांनुवर्षे संघर्षांचा विजय आहे. यावेळी आटपाडी भाजपचे जेष्ठ नेते विष्णुपंत अर्जुन , माजी सभापती जयवंत सरगर , करगणीचे सरपंच तात्याशेठ व्हनमाने , युवा नेते विनायक पाटील , चंद्रकांत दौन्डे , राहुल गुरव , चंद्रकांत काळे, अनिल हाके , दिगंबर मरगळे , रणजित विभुते , आदी भाजप पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.