आटपाडी पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफीचा प्रारंभ

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमत्त आमदार सुहास बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली,
दत्तात्रय पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोशिएशनअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा प्रारंभ उत्साहात करण्यात आला.

येथील श्रीराम कॉलेजच्या मैदानावर दिवस-रात्र प्रकाशझोतात टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होत आहे . स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी तानाजीराव पाटील ,धर्मेश पाटील , माजी नगरसेवक संजय तारळेकर ,असलम मुल्ला, दत्तात्रय पाटील, सभापती संतोष पुजारी, अरविंद चव्हाण, विनायक मासाळ, मनोज नांगरे पाटील, दत्तात्रय चव्हाण, दत्तात्रय पाटील, सुनील तळे उपस्थित होते .पंच म्हणून हणमंत देसाई, कृष्णदेव पाटील, सिद्धू गुरव, तर समालोचन रोशन पाताडे, गौरव पवार , राज वाघमारे करीत आहेत .