गल्फ अँड ब्ल्यू डेफ या ऑईल तयार करणाऱ्या कंपनीची नक्कल (डुप्लिकेट) केलेल्या चार बादल्या (बकेट्स) विट्यात सापडल्या. याप्रकरणी परशुराम सुखदेव कारंडे (रा लोकमान्य नगर ,पाडा नं ४,डिसोजा कंपाऊंडजवळ रूम नं ८१ ,ठाणे पश्चिम ) यांच्या फिर्यादीवरून विटा पोलिसांत संतोष रघुनाथ यादव (वय ४२,जीतराज लुब्रिकंट्स ,नेवरी रोड ,विटा) याच्याजवळील चार ऑईल बकेट्स जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला.
गल्फ अँड ब्ल्यू डेफ या ऑईल तयार करणाऱ्या कंपनीचे विक्री अधिकारी परशुराम कारंडे यांनी पथकासह शनिवारी विट्यात यादव यांच्या दुकानाची तपासणी केली , तसेच गोदामातही छापा टाकला. तिथे बनावट ऑईलच्या चार बादल्या (प्रत्येकी किंमत १,२३० रुपये) आढळून आल्या . याबाबत कारंडे यांनी विटा पोलिस ठाण्यात संतोष यादव याच्याविरोधात फिर्याद दिली आहे . त्यावरून कॉपीराईट ॲक्ट सन १९५७ चे कलम ५१,६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.