राम बाबर यांना दोराई फाउंडेशनचा ॲवॉर्ड

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा आपुलकीचे प्रतिष्ठानचे सदस्य राम बाबर यांना चेन्नई येथील दोराई फाउंडेशनचा एक्झेमप्लर ॲवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे. श्रीराम हॉटेल सांगोला येथे झालेल्या कार्यक्रमात दोराई फाउंडेशनच्या संस्थपिका डॉ. सुमित्रा प्रसाद यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर आपुलकी प्रतिष्ठानच्या उत्कृष्ट कार्यबद्दल आपुलकी प्रतिष्ठानचाही डॉ. प्रसाद यांनी गौरव केला. आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य राम बाबर हे विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असून त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल चेन्नई येथील दोराई फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आली. सन्मानपत्र ,शाल उत्कृष्ट असे पेंटिंग देऊन त्यांच्या सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी डॉ. सुमित्रा यांचे जावई नारायण वेंकेटेशन , बाबर कुटूंबीय , त्याचबबोरबर मित्रपरिवार आपुलकीचे प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी केले . तर आभार प्रदर्शन अरविंद केदार यांनी केले .