लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र दिसून आलेच अनेक पक्षप्रवेश देखील झाले. विट्यात देखील हे राजकीय वातावरण पहायला मिळाले. पण नुकतेच विट्यात ड्रग्ज प्रकरण तसेच विषबाधा सारखी प्रकरणे उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी अनिल आप्पा बाबर यांची भेट घेतलेली आहे.या भेटीमुळे एकच खळबळ उडालेली आहे. अलीकडच्या काळात विटा शहरात घडत असलेल्या विविध घटनांवर तसेच समस्यांवर त्यांनी चर्चा केल्याचे समजत आहे. विटा नगरपालिकेवर प्रशासन असलेले लोकप्रतिनिधी या नात्याने मर्यादा येतात.
विटा शहरातील अनेक समस्यांवर संवाद साधण्यासाठी विटा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी माजी नगरसेवक अनिल आप्पा बाबर यांची त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन भेट घेतलेली आहे. वैभव पाटील यांनी सध्या विटा शहरात चालू असलेल्या अनेक प्रश्नांवर, समस्यांवर सविस्तर चर्चा करून त्यावर मार्ग काढण्यासाठी चर्चा केलेली आहे. परंतु पाटील बाबर यांच्या या भेटीने विटा शहरांमध्ये एकच चर्चा सुरू झालेली आहे.