इचलकरंजी, गेल्या पाच-सहा दिवसापासून पडत असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे इचलकरंजी शहरवासियांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत सातत्याने वाढत होत असून बंधारा पाण्याखाली गेला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मागील पाच-सहा दिवसापासून वळवाच्या दमदार पावसाने हातकणंगले तालुक्यात हजेरी लावली आहे. त्यामुळे तालुक्यात ओढे, नाले, मे महिन्यात तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे खरीप हंगामाच्या पार्श्वभुमीवर केल्या जाणाऱ्या शेती मशागतीच्या कामांना ब्रेक लागला आहे. इचलकरंजी शहर परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे अनेक सकल भागात पाणी साचत आहे. तर लहान-मोठ्या गटारी ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत. शहरातील विकली मार्केट व आण्णा रामगोंडा मार्केटची दयनिय अवस्था झाली आहे. त्यामुळे विक्रेत्यांची गैरसोय होत असून ग्राहकांची वर्दळही कमी झाली आहे. सदरच्या वळीव पावसाचे आणखी काही दिवस मुक्काम असल्याचे हवामान खात्याकडून अंदाज वर्तविला आहे.