मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही

सांगोला ; प्रसार माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीच्या बातम्या प्रसारित होत आहेत. माझ्या नावाची उलट सुलट चर्चा सुरु आहे. मात्र, मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नसल्यामुळे माझे नाव जिल्हाध्यक्ष पदासाठी जोडणे यामध्ये कोणतेही तथ्य नाही,असे माजी आमदार दीपक आबा साळुंखे -पाटील यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्ष्यपदाच्या निवडीवरून सुरु असलेलया चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान याबाबत मा. आम. दीपक आबा साळुंखे-पाटील यांच्याशी सवांद असता, त्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर त्यांची भूमिका तटस्थ आहे . कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय अद्याप घेतला नाही. मी कोणत्या पक्षात जाणार याबाबत येणार काळ ठरवेल , असेही त्यांनी सांगितले आहे . यामुळे प्रसार माध्यमातून सुरु असलेल्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीच्या चर्चेला साळुंखे -पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे.