सांगोल्यात अजितदादांच्या शिलेदाराने थोपटले दंड! दिपकआबा साळुंखे पाटील यांचे ‘फिक्स आमदार’ असे झळकले बॅनर, पोस्टर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाची जोरदार तयारी सुरू असलेली पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेवलेले आहेत. अशातच कोणत्याही क्षणी आचारसंहिता देखील लागू शकते. अशातच आता सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारीवरून तर्कवितर्क सुरू झालेले आहेत. नवी मुंबईतील सिडको एक्सिबिशनमध्ये सांगोल्यातील मुंबईस्थित नागरिकांचा स्नेह मेळावा संपन्न झाला.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दीपकआबा साळुंखे पाटील यांच्यातर्फे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या माध्यमातून राष्ट्रवादी अजित पवार गटाने सांगोल्यातून लढण्याचे संकेत दिले आहेत.

या मेळाव्याने मात्र शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांची डोकेदुखी नक्कीच वाढली आहे. दीपक आबा साळुंखे पाटील यांनी सांगोल्यातील मुंबईस्थित नागरिकांसमोर मोठे शक्ती प्रदर्शन केले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी दीपकआबा साळुंखे यांच्या कार्यकर्त्यांनी ‘फिक्स आमदार’ असे बॅनर आणि पोस्टर झळकावले.

त्यामुळे सांगोल्यात शिंदे गट विरुद्ध अजित पवार गटात उमेदवारीवरून संघर्ष पेटणार असल्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे ‘ज्याचा आमदार त्याची जागा’ असे जागावाटपाचे सूत्र महायुतीत ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. जर हेच सूत्र अंतिम राहिले तर शहाजीबापू पाटील यांच्या उमेदवारीला कोणताही धोका नाही. तेव्हा मात्र शेकापच्या उमेदवाराविरोधात शहाजी बापू पाटील यांना फाईट द्यावी लागणार आहे.