आटपाडी ;झरे (ता. आटपाडी )येथे सोमवारी सायंकाळी शेतात काम करत असलेल्या एका महिलेवर दुचाकीवरून आलेल्या दोन चोरटयांनी हल्ला करीत जबरी चोरी केली. या महिलेचे सुमारे ३२ हजार ५०० रुपयांचे दागिने व मोबाईल हिसकावून चोरटयांनी पोबारा केला. याबाबत दिपाली पांडुरंग पुकळे (वय ३०,रा. पुकळेवस्ती ,झरे , ता. आटपाडी) यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली . फिर्यादीत म्हटले आहे की , दीपाली या शेतात काम करत होत्या. त्यावेळी दोन चोरटे मोटरसायकलवरून आले . त्यांनी दीपाली यांचे दागिने हिसकावून घेतले . दहा ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र ,पाच ग्रॅम सोन्याची कानातील कर्णफुले , १ ग्रॅम सोन्याच्या बुगड्या , चांदीची जोडवी , मोबाईल असा ऐवज घेऊन पसार झाले .
झरे येथे महिलेवर हल्ला करून दागिने लंपास
