सांगोला विधानसभा मतदार संघात गेल्या २५ वर्षापासून मा.आम.दीपकआबा साळुंखे पाटील यांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करीत विकासकामांचा झंझावात निर्माण केला आहे. मा.आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या संघटन कौशल्यामुळे आज शेकडो कार्यकर्ते दीपकआबांच्या गटात प्रवेश करीत आहेत. मा.आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या कल्पक आणि कार्यकुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून हंगीरगे, गावडेवाडी आणि जुजारपूर येथील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी दीपकआबा गटात प्रवेश केला.
ऐन विधानसभेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी दीपकआबा गटात प्रवेश केल्याने यामुळे शेकापला खिंडार पडले आहे. यावेळी मा.आम.दीपकआबा साळुंखे पाटील यांनी संपर्क कार्यालयात सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत सर्वांना सन्मानाची वागणूक देण्याचे आश्वासन दिले. तर प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत दीपकआबांना विजयी करण्यासाठी जीवाचे रान करणार असल्याचे सांगितले.