आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टर आपल्याला अंडी (Eggs) खायला सांगतात. लहान मुलं असो किंवा प्रौढ अंडे सर्वांसाठी आरोग्यसाठी फायदेशीर मानले गेले आहे. अंडी ही पौष्टिक आणि किफायतशीर अन्न असल्याने ते सर्वांना आवडतं. अंड्यातून प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा एक उत्कृष्ट स्रोत आपल्याला मिळतो. जीममध्ये व्यायाम करणारी, खेळात सक्रीय असणारी लोक अंड खाण्यावर जास्त भर देतात. पण देशी (तपकिरी) की पांढरे अंडे नेमकं आपल्या आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे, याबद्दल जाणून घेऊया .
सर्वात प्रथम अंड्याचे रंगाबद्दल जाणून घेऊयात. देशी अंडी भारतीय किंवा स्थानिक कोंबड्यांच्या जातींपासून येतात. जसे की देशी बंकर कोंबडी. ही अंडी हलक्या तपकिरी रंगाची देतात. दुसरीकडे, पांढरी अंडी सहसा थर जातीच्या जसे की व्हाईट लेगहॉर्न कोंबड्यांपासून येतात. अंड्याचा रंग केवळ कोंबडीच्या जातीवर अवलंबून असतो.
देशी अंड्यांमध्ये सामान्यतः थोडे जास्त पोषक घटक असून देशी कोंबड्या खुल्या वातावरणात राहतात आणि नैसर्गिक आहार कीटक, बिया, हिरवी पाने इ. खातात. त्यामुळे त्यांच्या अंड्यांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि बीटा-कॅरोटीन जास्त असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले गेले आहे. तर पांढरी अंडी सामान्यतः पोल्ट्री फार्ममध्ये वाढवलेल्या कोंबड्यांपासून मिळतात. जिथे त्यांना संतुलित आणि नियंत्रित आहार दिला जातो. ही अंडी स्वस्त आणि बाजारात सहज उपलब्ध असतात. कोंबड्यांना पौष्टिक आहार मिळाल्यास त्यांचे पोषण भारतीय अंड्यांसारखेच दिसतातय. जरी सहसा त्यांचे पोषण थोडे कमी असतं. पांढऱ्या अंड्यांचे कवच पातळ असते, ज्यामुळे ते तोडणे सोपे असतं.
आरोग्यासाठी काय फायदेशीर?
जर तुम्ही अधिक पोषण, नैसर्गिक स्रोत आणि निरोगी चरबी शोधत असाल तर देशी अंडी थोडी जास्त फायदेशीर आहेत. पण जर तुम्हाला बजेट आणि सहज पचण्याजोगा पर्याय हवा असेल तर पांढरी अंडी देखील एक चांगला पर्याय आहे. दोन्हीही त्यांच्या स्वतःच्या पातळीवर आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, तुम्हाला फक्त संतुलन आणि गरजेनुसार निवड करावी लागणार आहे. यासाठी तुम्ही डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.