भारताला पराभवाचा धक्का , WTC पॉईंट टेबल मध्ये घसरण

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. शुक्रवार 20 जून पासून या सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली होती. 24 जून रोजी या सामन्याचा शेवटचा दिवस होता यात टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 371 धावांचे आव्हान दिलं होतं. हे आव्हान इंग्लंडने 5 विकेट राखून पूर्ण केलं आणि सीरिजमधील पहिला टेस्ट सामना जिंकला. यासह इंग्लंडने भारत विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली.

भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिजचा पहिला टेस्ट सामना हा लीड्सच्या हेडींग्ले मैदानावर खेळवला गेला. यात टीम इंडिया (India) दुसऱ्या इनिंगमध्ये 364 धावांवर ऑल आउट झाली. त्यांनी इंग्लंडला 371 धावांचं लक्ष दिलं. यावेळी बेन डकेट ने 149 आणि जॅक क्रोलीने 65 धावा करून टीम इंडियाला बॅकफूटवर नेलं. या दोघांच्यानंतर जो रूटने नाबाद 53 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. भारताने मागे खेळलेल्या 9 टेस्ट सामन्यांपैकी हा सातवा पराभव होता.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2025 -27 च्या सायकलमध्ये भारत आणि इंग्लंड यांचा हा पहिला टेस्ट सामना होता. या लीड्स टेस्टमध्ये झालेल्या पराभवाने भारताला चौथ्या स्थानावर पोहोचवलं. तर इंग्लंडने यात पहिलं स्थान काबीज केलं. या पॉईंट्स टेबलमध्ये बांगलादेश आणि श्रीलंका सुद्धा पुढे आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 -27 च्या सायकलमध्ये आतापर्यंत दोन टेस्ट सामने झाले असून यात भारत इंग्लंड यांच्यातील पहिल्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला तर बांगलादेश विरुद्ध श्रीलंका टेस्ट सामना ड्रॉ झाला.