अदमापूर येथे बाळू मामाच्या दर्शनासाठी निघालेल्या वाकी (घेरडी) ता. सांगोला येथील ७ भाविकांच्या चारचाकी गाडीचा अपघात झाला. त्यामध्ये एकाच मृत्यू झाला. तर इतर ६ जण जखमी झाली आहेत. हा अपघात समोरच्या गाडीला ओव्हर टेक करण्याच्या नादात कोल्हापूर कागल रोडवरील पिंपळगाव येथे बुधवार , २५ जून रोजी मध्य रात्री २ सुमारास झाला. राजेश शिवाजी शिंदे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत नातेवाईकाकडून मिळालेली माहिती अशी, वाकी येथील राजेश शिवाजी शिंदे , अक्षय महादेव चन्ने , मोहन यशवंत शिंदे, नवनाथ विलास शिंदे, बबलू अशोक शिंदे , अर्जुन भाऊसाहेब शिंदे, आण्णा सुखदेव शिंदे हे मंगळवार , २४ रोजी अमावस्येनिमित्त अदमापूर येथील बाळू मामाच्या दर्शनासाठी निघाले होते. २५ रोजी रात्री २ च्या सुमारास समोरील गाडीला ओव्हर टेक करण्याच्या नादात त्यांचेकडील एम .एच . १२/ एन .पी ९४२४ या एर्टिगा गाडीवरील चालकाचा ताबा सुटून गाडी पलट्या खात रस्त्याच्या कडेला रानात जाऊन पडली. यामध्ये गाडीतील राजेश शिवाजी शिंदे याचा मृत्यू झाला तर अक्षय महादेव चन्ने हे मोठ्या प्रमाणात जखमी झाल्याने त्यांना सांगली येथे खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आला आहे. याच गाडीतील मोहन यशवंत शिंदे , नवनाथ विलास शिंदे , बबलू अशोक शिंदे , अर्जुन भाऊसाहेब शिंदे , आण्णा सुखदेव शिंदे या पाच जणांना प्राथमिक उपचारानंतर सांगोला येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे.