शेंडगेवाडी ग्रामस्थांचे उपोषण सुरूच

आटपाडी ,बनपुरी गावास जोडणाऱ्या शेंडगेवाडी गावचा रस्ता काही लोकांनी गेल्या काही वर्षांपासून अडवला आहे या संधर्भात शेंडगेवाडी ग्रामस्थ २३ जूनपासून आटपाडीत उपोषणास बसले आहेत. या उपोषणाची दखल प्रशासनाने कामचलाऊ पद्धतीने घेतल्याचा आरोप होत आहे. जोपर्यंत या रस्त्याचे डांबरीकरण होत नाही तोपर्यंत इथे टाकलेल्या मुरमीकरणावर आम्ही समाधानी नाही असे या ग्रामस्थांचे मुख्यमंत्री, मुख्यमंत्री सडक योजना विभाग, सांगली बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, आटपाडी पोलीस निरीक्षक यांनाही निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर समाधान कचरे , विनायकशेंडगे, सचिन बंडगर , समाधान पुकळे, नानासाहेब खताळ यांच्या सह्या आहेत.