कवठेमहांकाळ, आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात शनिवारी शेळ्या मेंढ्या व बकरी बाजारात विक्रमी उलाढाल झाली. या बाजारात नवी लोटेवाडी ता. सांगोला येथील शेतकरी सुखदेव निवृत्ती मोरे व भागवत सुखदेव मोरे यांच्या ७ महिन्यांच्या एका बकऱ्याला तब्बल ३२,५०० उच्यांकी दर मिळाला. बकऱ्याची खरेदी सुरेश महादेव पुजारी (रा. पुजारवाडी ) यांनी केला. व्यवहारामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण होते. या आठवडा बाजारात एकूण ४. कोटी ते ५ कोटी रुपयांची उलाढाल झाली. बोकड, बकरी आणि शेळ्यांच्या विक्रीस चांगला प्रतिसाद मिळाला. बाजारात चढाओढ लागल्याने नऊ बकऱ्यांची विक्रमी किमतीत विक्री झाली. चांगली किंमत मिळाल्याने शेतकऱ्यांनी डॉल्बीसह मिरवणूक काढत जल्लोष केला. यावेळी सोहळ्यात जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील, सभापती संतोष पुजारी, सुबराव पाटील, सुनील तळे आणि व्यापारी, शेतकरी सहभागी झाले होते. बाजार समितीकडून बाजारात शेतकऱ्यांना विविध सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. बाजार परिसर स्वच्छ व सुरक्षित असल्याने शेतकऱ्यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे. आटपाडी आठवडा बाजारात शेळ्या ,मेंढ्या , बकरी , बोकडे, देशी कोंबड्या विक्री व खरेदीसाठी कोकण , कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात शेतकरी व व्यापारी आले होते. उत्तम जातीच्या बकऱ्यांना उच्चानकी दर अनेक वेळा मिळाला आहे. मोरे यांच्या नऊ बकऱ्या विक्रमी दराने विकल्या गेल्याने त्यांनी डॉल्बी लावत आनंदोत्सव साजरा केला.
आटपाडीत आठवडा बाजारात बकऱ्याला ३२ हजार रुपयांचा दर
