मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाच्या शासकीय महापुजेचा मानकरी कसा ठरतो ?

म्हणतात ना! देव भक्तांचा भुकेला! खरच आहे ते. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या श्री विठोबा-रुखमाईच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी, भक्तगण तन-मन-धनाने पंढरीत जमले आहेत. गावोगावी ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा गजर होत आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा (Mahapuja) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पार पडली. फडणवीस यांना आषाढीच्या महापूजेचा पाचव्यांदा मान मिळाला. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यामधील जातेगावच्या कैलास दामू उगले (वय ५२) व कल्पना कैलास उगले (वय ४८) या दाम्पत्यास महापूजेचा मान मिळाला आहे.

विठुरायाच्या महापुजेचा मानकरी कसा ठरतो?
मुख्यमंत्र्यांसह शासकीय महापूजेचा मान मिळणं याला नशिबच लागतं. 15 ते 18 तास रांगेत उभं राहून पहाटेच्या सुमारास श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात पहिल्या येणाऱ्या दाम्पत्यास महापूजेचा मान मिळतो. रविवारी पहाटे २ वाजून २० मिनिटांनी शासकीय महापूजेला सुरुवात झाली. मुख्यमंत्री फडणवीस दाम्पत्य आणि मानाचे वारकरी उगले दाम्पत्यांच्या हस्ते विठ्ठलाची विधिवत पूजा पहाटे ३ वाजून ५ मिनिटांनी संपन्न झाली. त्यानंतर रुक्मिणी मातेची महापूजा झाली.

शासकीय महापूजा केलेल्या दाम्पत्यास वर्षभर एसटी सवलत
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यामधील जातेगावच्या कैलास दामू उगले (वय ५२) आणि कल्पना कैलास उगले (वय ४८) दाम्पत्यास महापूजेचा मान मिळाला आहे. पाच ते सात किलोमीटर अंतर रांगेत थांबून उगले दाम्पत्याने पहाटेच्या सुमारास मंदिरात प्रवेश मिळाला. पाच ते सात किलोमीटर रांगेत म्हणजेच 15 ते 18 तास थांबून हा मान मिळाला. नाशिक जिल्ह्यातील उगले दाम्पत्यास शासकीय महापूजेचा मान मिळाल्यानंतर वर्षभर एसटी पासमध्ये सवलत देण्यात आली आहे.