विटा येथे एका कृषी दुकानावर चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल तीन लाख रुपयांची रोकड लंपास केली असल्याची फिर्याद विटा पोलीस ठाण्यात अमर जाधव यांनी दिली आहे. याबाबत विटा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, विटा – सांगली रस्त्यावरील ओढ्यानजीक आळसंद येथील अमर प्रकाश जाधव यांचे यशवंत कृषी उद्योग समूहाचे शेती औषध व खत दुकान आहे. या दुकानात अज्ञात चोरट्यांनी दि. १२ ते १३ रोजी मध्यरात्री ते पहाटेपर्यंत दुकानाच्या पाठीमागील पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला. यामध्ये दुकानातील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्यात आलेले १००, २०० व पाचशे रुपयांच्या नोटा त्यातील चोरट्याने हातोहात लंपास केले आहेत. जवळपास २ लाख ९० हजाराची रोकड या चोरट्यांनी लंपास केल्याची फिर्याद अमर जाधव यांनी विटा पोलीस ठाण्यात दिली आहे.
विटा येथील कृषी दुकान फोडून तीन लाखाची रोकड लंपास
