नव्या व्हेरियंटने सोलापुरातील एका वृध्दाचा घेतला बळी ! होणार मास्कसक्ती

गेल्या दोन वर्षांपूर्वी कोव्हिड-१९ या जीवघेण्या आजाराने हैदोस घातला होता. आता ‘कोरोना’च्या जेएन-१ हा नवा व्हेरियंट आला असून या व्हेरियंटने सोलापुरातील भवानी पेठ येथील एका वृध्दाचा बळी घेतला.

त्यांना रक्तदाब, मधुमेहचा आजार होता. त्यांच्यावर बायपास सर्जरी देखील झालेली होती. त्यांना सारखे झटकेही येत होते. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर ते पॉझिटिव्ह आढळून आले होते.

२२ डिसेंबर २०२३ रोजी जेएन-१ या व्हेरियंटचा शहरातील पहिला रुग्ण आढळून आला. गेल्या ८ दिवसात शहरातील संशयित ७३ रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली.

यातून ६१ जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. रविवार, ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत शहरातील ८ पुरुष व ४ महिला असे एकूण १२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यातून पूर्णपणे बरे झालेल्या २ रुग्णांना घरी सोडण्यात आले.

सध्या शहरातील विविध रुग्णालयांमध्ये ८ पुरुष आणि २ महिला अशा १० जणांवर तातडीचे उपचार सुरू करण्यात आले आहेत.

सोलापुरात कोरोना झालेल्यांमध्ये वृध्द पुरुषांची संख्या अधिक आहे. कोरोना संदर्भात पुणे येथील ससून आणि एनआयव्ही अशा दोन ठिकाणी तपासणीसाठी पाठविण्यात येत असून त्याचे अहवाल तेथूनच ऑनलाईन पध्दतीने मिळत आहेत. शहरातील महापालिकेसह खासगी रुग्णालय देखील विविध उपायोजनांसह रुग्णांच्या उपचारासाठी सज्ज झाले असून त्यांना प्रशासनाने विविध सूचना दिल्या