स्मार्टफोन्समध्ये नव-नवीन फीचर्स असतात. यातील एक फीचर म्हणजे कॉल केल्यानंतर कॉलरचे नाव आणि नंबर पाहता येतो. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नवीन दूरसंचार विधेयकानुसार युझरचे नाव आणि नंबर पाहता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.नवीन दूरसंचार विधेयकानुसार काही बदलण्यात आला आहे. यात विधेयक Calling Name Presentation (CNAP) यादीतून हा मुद्दा काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे कॉल करणाऱ्या युझरचे नंबरसोबत नाव दिसणार नाही. हे नियम सर्व कंपन्यांसाठी समान होते. सरकारने गोपनीयता आणि डेटा चोरीसारख्या समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण गोपनीयता आणि डेटा उल्लंघनासंदर्भात नवीन नियमांवर सातत्याने काम केले जात आहे. या अंतर्गत हा नियम आणण्यात आला आहे. यामुळे डेटा चोरीसारख्या समस्या आळा घालण्यासाठी नियम आणले आहे. जर कंपन्यांनी युझरची नावे उघड केली तर युझरची गोपनीयतेचेही उल्लंघन होईल. आता नेटवर्क कंपन्या कोणत्याही युझरचे नाव दाखवू शकणार नाहीत.
Truecaller बंद होणार….
