विटा पोलिसांना यश! दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

विटा तालुक्यात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या चोरीचा छडा विटा पोलिसांनी लावला आहे. पृथ्वीराज उर्फ रामा कुमार मदने वय 24 राहणार वासुंदे तालुका खानापूर आणि तुषार परशुराम पवार वय 22 राहणार रांजणी तालुका कवठेमंकाळ संबंधित संशयतांची नावे असून त्यांच्याकडून सुमारे ३७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल असा दोन लाख बारा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. विटा तालुक्यातील घोटी खुर्द येथील लक्ष्मी भरत कदम वय 73 या गावाच्या हद्दीत ग्रामपंचायत जवळ चालत जात असताना चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिजडा मारून चोरून नेली होती.

तसेच सुमन यशवंत सूर्यवंशी चिखलहोळ येथील राहणाऱ्या वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी ही अशीच त्यांनी हिसरा मारून पळवून नेली होती. पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या सूचनेनुसार संशयित रामा मदने याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

मदने आणि तुषार पवार या दोघांनी चोरी केल्याचे कबूल केले आहे. दरम्यान रामा मदने याला अटक केली असून तुषार पवार हा फरार असल्याचे विटा पोलिसांनी सांगितले आहे.