बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे बॉलिवूडचं लोकप्रिय ‘पॉवर कपल’ आहे. दीपिका आणि रणवीरची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरते. त्यांच्या लग्नाला आता पाच वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. अशातच आता अभिनेत्री आई होणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह 2018 मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाला पाचपेक्षा जास्त वर्षे पूर्ण झाली आहेत. अशातच आता दीपिका कधी गुडन्यूज देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दीपिका आणि रणवीर दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे.
वोग सिंगापुरला दिलेल्या मुलाखतीत दीपिका पादुकोण म्हणाली,”रणवीर आणि मला लहान मुले खूप आवडतात. आमच्या कुटुंबात नव्या सदस्याची एन्ट्री कधी होणार याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. कुटुंबातील मंडळी मला भेटल्यानंतर माझ्यात काहीही बदल झाला नाही”, असं आवर्जुन सांगतात. दीपिका पुढे म्हणाली,”इंडस्ट्रीत पैसे आणि फेम मिळवलं असलं तरी आजही माझे पाय जमिनीवरच आहेत. घरी मी सेलिब्रिटी नसते. माझे पाय जमिनीवर ठेवण्यात माझा कुटुंबियांचा मोठा वाटा आहे. रणवीर आणि मी आमच्या मुलांवरदेखील असेच संस्कार करू”.
दीपिका पादुकोण 2023 मध्ये दोन बड्या ब्लॉकबस्टर सिनेमांचा भाग होती. ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमात शाहरुख खान आणि जॉन अब्राहमसोबत दीपिका दिसून आली. तसेच किंग खानच्या ‘जवान’ (Jawan) या सिनेमातदेखील तिची स्पेशल झलक दिसून आली आहे. दीपिकाचा ‘फायटर’ (Fighter) हा सिनेमा 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात दीपिका हृतिक रोशनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
दीपिका पादुकोण ही लोकप्रिय सिने-अभिनेत्री आहे. ‘ओम शांती ओम’ या सिनेमाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. दीपिका आज भारतातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक सुपरहिट सिनेमांचा ती भाग आहे.