सेन्ट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेश नं (Central Board of Secondary Education) काही दिवसांपूर्वी इयत्ता दहावी (10th CBSE Board Exam 2024) आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचं वेळापत्रक (12th CBSE Board Exam 2024) जाहीर केलेलं. आता या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. जे विद्यार्थी 2023-2024 या शैक्षणिक वर्षात परीक्षेला बसणार आहेत, त्यांना सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन परीक्षेचं वेळापत्रक पाहता येणार आहे. विद्यार्थी अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर आपलं वेळापत्रक पाहू शकतात. तसेच, विद्यार्थी हे वेळापत्रक अधिकृत वेबसाईटवरुन डाऊनलोडही करू शकतात.
सीबीएसईनं जारी केलेल्या सुधारीत वेळापत्रकानुसार, काही विषयांच्या पेपरच्या परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. इयत्ता दहावीची तिबेटमधील पेपर परीक्षा आता 23 फेब्रुवारी रोजी घेतली जाईल, यापूर्वी जारी करण्यात आलेल्या वेळापत्रकात हा पेपर 4 मार्च रोजी घेतला जाणार होता. तसेच, इयत्ता दहावीची रिटेल परीक्षा 16 फेब्रुवारीला होणार होती, ती आता 28 फेब्रुवारीला होणार आहे. याशिवाय बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहेत. बारावी फॅशन स्टडीजची परीक्षा आता 11 मार्चऐवजी 21 मार्चला होणार आहे.
सुधारीत वेळापत्रकानुसार, सीबीएसई बोर्डाकडून 15 फेब्रुवारीपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. इयत्ता दहावीच्या परीक्षा 13 मार्चला संपणार आहेत, तर बारावीच्या परीक्षा मात्र 2 एप्रिलला संपणार आहेत. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेतल्या जातील. सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या वेळेत सर्व दिवस परीक्षा होणार आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ने इयत्ता 10वी आणि 12वीची डेटशीट नुकतीच जारी केली आहे. त्याबरोबरच काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. विद्यार्थी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन डेट शीट डाऊनलोड करू शकतात. डेटशीट डाऊनलोड करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.
CBSE Board Exam 2024 Date Sheet Out: कसं डाऊनलोड कराल सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनचं सुधारित वेळापत्रक?
स्टेप 1 : सर्वात आधी सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर लॉगइन करा.
स्टेप 2 : त्यानंतर होम पेजवर दहावी आणि बारावीच्या सुधारित वेळापत्रकाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3 : आता एक नवी पीडीएफ तुमच्या समोर येईल
स्टेप 4 : या पीडीएफमध्ये वेळापत्रक असेल, वेळापत्रकातील सर्व तारखा तपासून पाहा.
स्टेप 5 : तुम्ही तुमच्या सोयीसाठी शेड्यूल डाऊनलोड करुन घेऊन शकता, तसेच, प्रिंटही काढू शकता