तुम्ही सुद्धा नोकरीच्या शोधात असाल तर तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बेरोजगार आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाकडून मोठी मेगा भरती काढण्यात आली आहे. या भरतीमध्ये योजनादूत निवडले जाणार आहेत. त्यामुळे या योजनेसाठी अर्ज करू शकता.
योजनादूत म्हणजे काय?
योजनादूत हे पदाचे नाव आहे. या पदासाठी गावागावांत एका व्यक्तीची निवड केली जाणार आहे. सदर उमेदवाराला शासनाकडून दर महा १०,००० रुपये इतकं मानधन सुद्धा दिलं जाणार आहे. नियुक्तीचा कालावधी ६ महिने असणार आहे. महाराष्ट्र शासनासह हे काम केल्यावर याचे एक प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला मिळेल.
काम काय करावे लागेल?
या योजनेत काम करण्यासाठी संबंधित उमेदवाराला सरकारने नागरिकांसाठी ज्या काही योजना सुरू केल्या आहेत त्याची माहिती घरोघरी पोहचवायची आहे. गावातील सर्व व्यक्तींना योजनांचा कशा पद्धतीने लाभ घेता येईल याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचे आहे. घरोघरी जाऊन लोकांना योजनांची माहिती देण्यापासून त्यांना योजनेचा लाभ मिळेपर्यंत मदत करायची आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड, रहिवासी दाखला,पदवी प्रमाणपत्र, संगणक प्रमाणपत्र (MSCIT)
अर्ज कसा करायचा?
या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला mahayojanadoot.org या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. येथे तुम्ही सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
सदर योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्ही १३ सप्टेंबर २०२४ ही शेवटची दिनांक आहे. या तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता.