पंधरा हजारांपेक्षा जास्त कुस्ती शौकिनांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत झालेल्या लढतीत या वर्षीचा ‘भीमा केसरी’ होण्याचा मान पैलवान सिकंदर शेख याने पटकावला.पंजाब केसरी प्रदीपसिंग जिरगपूरला चितपट करत सिकंदर शेखने डबल भीमा केसरी किताब घेण्याची किमया केली आहे.
राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा देत सिकंदर शेख याचा सन्मान करण्यात आला. दरम्यान, कुस्ती क्षेत्रासाठीच योगदान विचारात घेऊन खासदार महाडिक यांचा सन्मान करत सिकंदरने श्री महाडिक यांना खांद्यावर घेत मैदानाची फेरी मारली.या स्पर्धेचे आयोजन भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी कारखाना कार्यस्थळावर केले होते.
भीमा केसरीच्या किताबासाठी झालेल्या लढतीत दोन्ही ही पैलवान हे तुल्यबळ होते.पंजाब केसरी विजेता प्रदीपसिंग जिरगपूर विरुद्ध महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख अशी कडवी झुंज झाली. १५ व्या मिनिटाला वेगवान आणि आक्रमक कुस्ती खेळणाऱ्या सिकंदर पुढे प्रदीपसिंगचा निभाव लागला नाही.
प्रदीपसिंगला चितपट करून सलग दुसऱ्यांदा भीमा केसरी होण्याचा बहुमान सिकंदर शेख ने पटकाविला. यावेळी मनोहर डोंगरे, धैर्यशील मोहिते-पाटील, शिवाजीराव काळुंगे, उमेश पाटील, सुजित कदम, समाधान काळे,
बी.पी.रोंगे, मानाजी माने, श्रीकांत देशमुख, विराज अवताडे, चरणराज चवरे, पृथ्वीराज माने, दीपक माळी, शिवाजी पवार, सतीश जगताप, तानाजी गुंड, शिवाजी गुंड सुशील क्षीरसागर, काकासाहेब पवार, अस्लम काझी यांच्यासह भीमा कारखाना आजी-माजी संचालक,भीमा परिवारातील कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने कुस्ती शौकीन उपस्थित होते.
दरम्यान भीमा केसरीच्या आखाड्यात प्रथमच महिला पैलवानांच्या कुस्त्यांची घोषणा करण्यात आली.पूर्ण कुस्ती सूट घालून महिला पैलवान मुली लाल मैदानाच्या आखाड्यात उतरल्या. खा धनंजय महाडिक यांच्या मातोश्री मंगलताई महाडिक व स्नूषा वैष्णवी महाडिक यांच्या हस्ते महिला कुस्त्यांचा आरंभ करण्यात आला. यावेळी विजेत्या महिला पैलवानास मंगलताई महाडिक यांनी पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.