सध्या राज्यात विधानसभेच्या तयारीचे राजकीय वारे वाहत असतानाच याच धामधुमीत राजकीय श्रीगणेशा करण्याच्या दृष्टीने भैरवनाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघात 2500 घरगुती गणपतीचे वाटप करून राजकीय श्रीगणेशा केला.
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात सध्या अनेकजण उमेदवारीसाठी इच्छुक होऊ लागले आहेत.इच्छुकांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असताना त्यातून आपली राजकीय मोर्चे बांधणी करत असताना त्या त्या उमेदवाराला राजकीय राजश्रय असणे आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून या मतदारसंघात सध्या भाजपकडून विद्यमान आमदार समाधान आवताडे हे दावेदार मानले जात आहेत.
दरम्यान, अनिल सावंत यांनी तुतारी कडून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले असले तरी शरद पवार व जयंत पाटील यांच्या मनातील उमेदवार असल्यामुळे त्यांना मंगळवेढा पंढरपूर विधानसभेची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.
मात्र विधानसभा निवडणुकीचा आखाडा अद्याप जाहीर झाला तरी राजकीय आखाड्याचा मुहूर्त साधण्याच्या दृष्टीने आजपासून सुरू होणाऱ्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी मतदारसंघातील गणेशभक्त तयारीत असतानाच भैरवनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी मतदारसंघातून 2500 गणेश मूर्तीचे वितरण करून आपला राजकीय श्रीगणेशा करण्याचा प्रयत्न केला.