‘या’ दिवशी रंगणार इंडिया-अफगाणिस्तान टी 20 सामना…..

प्रत्येकालाच क्रिकेटचे वेड खूपच आहे. आयपीएल तर प्रत्येकाचाच आवडीचा. टी 20 सामना पाहण्यासाठी देखील प्रत्येक जण उत्सुक असतोच. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात अफगाणिस्तान विरुद्ध टी 20 मालिका खेळण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. टीम इंडिया विरुद्ध या मालिकेसाठी अफगाणिस्तान आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर पुन्हा एकदा भारत दौरा करणार आहे.

या टी 20 सीरिजमध्ये उभयसंघात एकूण 3 सामने होणार आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या हिशोबाने दोन्ही संघांसाठी ही मालिका फार महत्त्वाची आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंना या सीरिजमध्ये चमकदार कामगिरी करुन वर्ल्ड कपमध्ये आपला दावाही मजबूत करण्याची संधी आहे.

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील टी 20 मालिकेचं आयोजन हे 11 ते 17 जानेवारी दरम्यान करण्यात आलं आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचं नोव्हेंबर 2022 नंतर टीममध्ये कमबॅक झालंय. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

रोहित-विराट या दोघांचा खेळ पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या मालिकेतील तिन्ही सामने कुठे-कधी पाहता येतील हे आपण जाणून घेऊयात.टीम इंडिया-अफगाणिस्तान मालिका ही टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येईल. इंग्रजी, तमिळ तेलुगु आणि कन्नड या 4 भाषांमध्ये या नेटवर्क चॅनेल्सवर कॉमेंट्री ऐकता येईल.

तसेच कलर्स सिनेप्लॅक्स या चॅनेलवर हिंदी कॉमेंट्रीसह सामना पाहता येईल. तसेच मोबाईल आणि टीव्हीवर सामने जिओ सिनेमावर मोफत पाहता येतील. एकूण 11 भाषांमध्ये क्रिकेट चाहत्यांना कॉमेंट्री ऐकता येणार आहे.या 11 भाषांमध्ये मराठीचाही समावेश करण्यात आलेला आहे.

अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी

टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.

अफगाणिस्तान टीम

इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह झझाई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान.