टी 20 वर्ल्ड कपमध्ये आता करो या मरोच्या परिस्थितीमध्ये भारत आहे. दक्षिण आफ्रिकेसोबतच्या सामन्यात दारूण पराभव झाल्यानंतर भारताला मोठा दणका बसला. पुढील दोन सामने भारताला जिंकल्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. त्यापैकी एक सामना भारताने जिंकला.आता खरी लढत भारतापुढे आहे. वेस्ट इंडिजसोबत भारताचा 1 मार्च 2026 रोजी सामना आहे. कोलकाता येथील ईंडन गार्डन्समध्ये 7 वाजता हा महामुकाबला रंगेल. हा सामना जिंकला की, थेट टिकट टू सेमीफायनलमध्ये जाण्याची मोठी संधी मिळेल. आता या सामन्यापूर्वी काही मोठे बदल संघात होतील, असे सांगितले जाते. गोलंदाजांमध्ये बदल होण्याचे संकेत आहेत. झिम्बाब्वे विरोधातील सामना जिंकल्यानंतरही सूर्यकुमार यादव याने चिंता व्यक्त केली होती.
शिवम दुबे याने 2 ओव्हर्समध्ये तब्बल 47 धावा दिल्या. वरूण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांचाही गेम काही खास राहिला नाही. सध्याच्या परिस्थितीला टीम सेट असली तरीही काही बदल केले जाऊ शकतात, असे बोलले जात आहे. काही सामना तितका जास्त महत्वाचा आहे. तिलक वर्मा याने झिम्बाम्वे विरूद्धच्या सामनात 16 बॉलमध्ये 44 रन बनवून आल्या फॉर्मबद्दल संकेत दिले. अभिषेक,संजू सॅमसन यांच्या पार्टनरशिपने झिम्बाब्वे विरोधातील सामन्यात चांगले प्रदर्शन केले.
रिंकु सिंग, सुंदर वॉशिंग्टन, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव प्लेइंग 11 च्या बाहेर आहेत. मात्र, वेळ पडली तर काही बदल होऊ शकतात. कारण भारतीय क्रिकेट संघाला कोणत्याही परिस्थितीमध्ये सामना जिंकायचा आहे. संघ व्यवस्थापकांना संघात सध्याच्या स्थितीला कोणतेही बदल करण्याची इच्छा नसली तरीही काही निर्णय वेळेनुसार घेतले जाऊ शकतात. 11 चा संघ सध्या सेट आहे.
सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे की, जर भारत वेस्ट इंडिज सामना जर पावसामुळे रद्द झाला तर नक्की काय समीकरण असणार. कोणत्याही परिस्थितीमध्ये सामना खेळला जावा हीच भारताची भूमिका असणार आहे. कारण जर पावसामुळे सामना झाला नाही तर याचा फटका थेट भारताला बसेल नेट रनरेटनुसार, वेस्ट इंडिज थेट सेमीफायनलमध्ये जाईल.
