परीक्षा केंद्रावर विद्यार्थिनीशी गैरवर्तन, मोबाईलवर वारंवार फोन, संतप्त नातेवाईक शाळेत घुसले अन्…

इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीशी लगट करणाऱ्या आणि तिच्या मोबाईल क्रमांकावर सातत्याने कॉल करून छळणाऱ्या शिक्षकाला नातेवाईकांनी चांगलाच धडा शिकवला.
सध्या राज्यात इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वीची बोर्डाची परीक्षा सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर परिसरातील एका परीक्षा केंद्रावर एक धक्कादायक प्रकार समोर आला. परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीशी येथील शिक्षकाने ओळख केली. तिचा मोबाईल क्रमांकही मिळवला. (teacher) त्यानंतर तिच्याशी त्याने गैरवर्तन केले. तिला तो वारंवार फोन करून त्रास देऊ लागला. हा प्रकार विद्यार्थिनीने घरी सांगितला. संतप्त पालकांनी थेट शाळा गाठली. हा प्रकार कळताच संस्था चालकही भडकले. या सर्वांनी शिक्षकाची चांगलीच धुलाई केली. प्रकरण उघड होताच संतप्त नातेवाईकांनी संस्थेत धाव घेत शिक्षकाला चोप दिला. शिक्षकाला चोप देतांनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या विद्यार्थिनीला संबंधित शाळेचं परीक्षा केंद्र मिळालं होतं. तिथं या शिक्षकांची परीक्षा केंद्रावर नेमणूक होती. परीक्षा सुरू असताना या शिक्षकाने तिच्याशी ओळख वाढवली. तिला विश्वासात घेतले. तिचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर तिच्याशी लगट करण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यानंतर तो तिला वारंवार फोन करू लागला. हा प्रकार असह्य झाल्याने तरुणीने ही बाब घरी सांगितली. संतप्त नातेवाईकांनी थेट संबंधित महाविद्यालय गाठले.

संतप्त नातेवाईक या शिक्षण संस्थेत दाखल झाले. त्यांनी घडलेला प्रकार संस्था चालकांनासह इतर शिक्षकांना सांगितला. या शिक्षकाला बोलवण्यात आले. त्याने चूक झाल्याचे मान्य केले. (teacher) त्यानंतर नातेवाईकच नाही तर संस्था चालकानेही त्याला चोप दिला. या शिक्षकाने इतर विद्यार्थिनीनाही त्रास दिला काय याची आता चौकशी करण्यात येणार आहे. या घटनेने परीक्षा केंद्रावर काही काळ तणाव निर्माण झाला. इतर पालकांनी शिक्षकावर तात्काळ कारवाईची मागणी केली.

परीक्षा केंद्र परिसरात असा प्रकार घडल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली. शिक्षकाने चूक कबूल केल्यानंतर त्याला तात्काळ निलंबित करण्यात आले. शिक्षण संस्थेने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत चौकशी समिती गठीत केली. हा शिक्षक चौकशीत दोषी आढळला तर त्याच्यावर पुढील कडक कारवाई करण्याचे आश्वासन संस्थेने दिले. (teacher) परीक्षा केंद्रावर असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचे आश्वासन पालकांना देण्यात आले आहे. तर घटना कळताच पोलिसांनी शाळेत धाव घेतली. या विद्यार्थिनीचा जबाब नोंदवल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.