सोलापुरात झालेल्या खूनाचाआरोपी सात तासात जेरबंद…..

अनैतिक संबंधातून आतेभावाचा खून केल्याच्या प्रकरणाचा छडा पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या पथकाने अवघ्या सात तासात लावत संशयित अर्जुन गोरख शेगर (रा. पळसदेव ता. इंदापूर जिल्हा पुणे) याला जेरबंद केले.

या प्रकरणातील सविस्तर माहिती अशी की, ११ जानेवारी रोजी स.7 च्या सुमारास मंगळवेढा शिवारातील जुना बोराळे नाक्याजवळ गैबी मकानदार याच्या विटभटटीवर ज्ञानेश्वर उर्फ माऊली महादेव शिंदे (वय-२५ वर्षे, रा- मुळ ५८ फाटा, म्हस्कोबाच्या मंदिरामागे माळशिरस, जि- सोलापुर) याचा डोक्यात दगड मारुन खुन केल्याची माहीती मिळाली.

तात्काळ घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी, विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक रणजीत माने, सपोनि रेवननाथ डमाळे, स.पो.नि. बापूसाहेब पिंगळे, स.पो.नि. अंकुश वाघमोडे, पो.उप.नि. सौरभ शेटे, पो.उप.नि. पुरूषोत्तम धापटे, हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले असता घराच्या बाहेरील अंगनामध्येच अंथरुनामध्येच झोपलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह दिसून आला.झोपेमध्येच दगड टाकुन खुन केल्याचे दिसुन आले तसेच शेजारी रक्ताने माखलेला दगड सुध्दा पडल्याचे दिसले.

त्यावेळी पोलीसांनी आसपास चौकशी करत तपासाची चक्री वेगाने फिरवली असता सदरील खून हा त्याचाच नातेवाईक नामे अर्जुन गोरख शेगर (रा- पळसदेव, ता- इंदापुर, जि- पुणे) याने केल्याचे उघड झाल्याने त्यास तात्काळ ताब्यात घेवुन अटक करण्यात आली.पत्नीवर अनैतिक संबंध असल्याचा संशय धरून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रणजीत माने, स.पो.नि. रेवननाथ डमाळे, स.पो.नि. बापूसाहेब पिंगळे, स.पो.नि. अंकुश वाघमोडे, पो.उप.नि. सौरभ शेटे, पो.उप.नि. पुरूषोत्तम धापटे, सलीम शेख, अविनाश पाटील, प्रमोद मोरे, वैभव लेंडवे, श्रीमंत पवार, कृष्णा जाधव, ईश्वर दुधाळ राजू आवटे, यांनी केला.