आटपाडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार!

आटपाडी तालुक्यातील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस कारमध्ये जबरदस्तीने बसवून येथील तलावावर नेऊन कारमध्येच बलात्कार केल्याची घटना 10 आणि 11 ऑगस्ट रोजी घडली.

याबाबत पीडितेच्या वडिलांनी संशयित संग्राम देशमुख (वय 27, रा.आटपाडी) व सुमित्रा लेंगरे (32, रा. लेंगरेवाडी) यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडितेला संग्राम व सुमित्रा यांनी जबरदस्तीने लाल रंगाच्या कारमध्ये बसवले.

तलावावर नेऊन संग्राम देशमुख याने तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कोणाला काही सांगितले, तर बहिणीला व घरच्यांना जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिली. पीडितेचे कपडे काढून फोटो व व्हिडीओ चित्रीकरण केले.

तसेच उद्या पण ये. नाही आलीस तर व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक विनय बहिर यांनी भेट दिली असून, सपोनि रमेश जाधव तपास करत आहेत. संशयित संग्राम हा जिम चालक आहे. तो जिममध्ये आलेल्या महिला व मुलींचे आक्षेपार्ह व्हिडीओ व फोटो काढायचा.

सुमित्रा लेंगरे ही परिचारकिा असून तिच्या माध्यमातून तो पीडितेला ब्लॅकमेल करत असल्याची चर्चा आहे. ही परिचारिका एका खासगी रुग्णालयामध्ये काम करते. अशा घटनांमधील तिचा सक्रिय सहभाग देखील उघड झाला आहे.