अयोध्येत २२ जानेवारीरोजी प्रभू श्री राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र आनंदाला उधाण आले आहे. तर यानिमित्ताने बाजारपेठेत श्री राम यांची प्रतिमा असलेली चांदीची नाणी, ब्रेसलेट, हातातील कडे आदी वस्तूंना मागणी वाढली आहे.
श्री राम मंदिर महोत्सव हा सध्या जगभर श्रध्देचा भाग बनला आहे. संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या प्रभू श्री राम यांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होत आहे.
भारतात सर्वत्र घराघरात या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका व मंगल अक्षता पोहोच करण्यात येत आहेत. त्यामुळे सर्वत्र श्री राममय वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर चांदीचे ब्रेसलेट, कडे, नाणी यांना मोठी मागणी वाढली आहे. भक्तगण त्याची खरेदी करताना दिसत आहेत.
हा महत्त्वपूर्ण सोहळा व त्यामुळे निर्माण झालेल्या वातावरणामुळे याची मागणी वाढली आहे.अगदी कमीत कमी वजनापासून सर्वांना परवडेल अशाप्रकारच्या वस्तू हुपरीसह जिल्ह्यातील सराफ बाजार पेठेत उपलब्ध आहेत. त्यामुळे युवक वर्गात आकर्षण ठरले आहे.