गोकुळ अष्टमी निमित्त शिवसेना युवा सेना कोल्हापूर जिल्हा हुपरी शहर वंदे मातरम बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट, यांच्यावतीने १लाख ७५ हजार रुपयाची भव्य अशी दहीहंडी शनिवार दि. ३१ ऑगस्ट रोजी सायं. ५ वाजता हुतात्मा स्मारकाच्या भव्य मैदानावरती आयोजन करण्यात आलेले आहे. या सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार असून या सोहळ्यास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खा. धैर्यशील माने, युवा सेना सचिव किरण माळी, आ.डॉ.विनय कोरे, आ.प्रकाश आंबिटकर, आ.प्रकाश आवाडे, आ. डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर), माजी आ.चंद्रदीप नरके, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे, माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील, जिल्हाप्रमुख रवींद्र माने, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दलितमित्र अशोकराव माने यांच्यासह जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, असे जिल्हाप्रमुख तथा गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव यांनी सांगितले आहे.
शिवसेनेच्या भव्य दहीहंडी उत्सवाचा जल्लोष द्विगणित करण्यासाठी जिल्ह्यातील तमाम हिंदू प्रेमी, शिवप्रेमी, गोविंदा प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन हि त्यांनी केलेले असून महाराष्ट्रातील गोविंदा पथकाने राजेंद्र पाटील, शिवाजी मुरलीधर जाधव, भरत देसाई यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आह