हुपरीत अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीची प्रतिष्ठापना!

सर्वजण 22 जानेवारी ची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. या दिवशी आयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तर हुपरी येथील लोहार समाजातील युवकांनी आयोध्यामध्ये प्रभू श्रीराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती बनवली होती आणि याच प्रतिकृतीची प्रतिष्ठापना विधिवतपणे हुपरीत करण्यात आली. यामुळे हुपरी शहरातील नागरिकांना अयोध्येचे वारी केल्याचे समाधान मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.