कोणतेही सहकारी काम पूर्ण करण्यासाठी हेलपाटे हे खूपच मारावे लागतात सरकारी काम म्हणजेच सहा महिने काम अशी परिस्थिती प्रत्येकालाच पाहायला मिळते असाच एक प्रकार सध्या वाळवा येथे घडला आहे.
वाळवा तालुक्यामध्ये एका रुग्णाला त्याच्या पेन्शचे पैसे मिळवण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेतून प्रवास करावा लागला आहे. वाळवा तालुक्यातल्या कणेगाव येथील युवराज संभाजी बनसोडे यांना दर महिन्याला पेन्शन मिळते. पण या पेन्शनसाठी त्यांना नियमाप्रमाणे हयातीचा दाखला मागण्यात आला होता.
त्यासाठी त्यांना येलूर येथील बँक कर्मचाऱ्यांनी युवराज बनसोडे यांनी सांगलीतील ट्रेझरी ( कोषागार ) कार्यालयामध्ये जाण्यास सांगितले. हे कार्यालया बॅंकेपासून तब्बल 50 किमी लांब होतं.जिवंत असल्याचा पुरावा मिळण्यासाठी बनसोडे यांना प्रकृती अत्यंत खालावली असतानाही सरकारी कार्यालयाचे खेटे मारावे लागले आहेत.
बनसोडे यांना त्यांच्या नातेवाईकांनी ॲम्बुलन्समधून सांगलीतल्या ट्रेझरी कार्यालयात आणलं होतं. या धक्कादायक प्रकारामुळे ट्रेझरी आणि बँकेच्या कारभाराविरोधात नातेवाईकांकडून आता संताप व्यक्त करण्यात येतोय.