हातकणंगले, विधानसभा मतदार संघातील हुपरी, वडगाव नगरपरिषद व हातकणंगले नगरपंचायतीला नगरविकास विभागाकडील वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून पाच कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार अशोकराव माने यांनी दिली.
नुकतेच नगरविकास विभागाकडे आमदार डॉ. अशोकराव माने यांनी मागणी केल्याप्रमाणे तिन्ही ठिकाणी मिळुन पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये हुपरी नगरपरिषदेकडील सामाजिक सभागृह, स्मशानभूमी अंतर्गत कामे,व्यवस्थेची कामे, बगीचा विकसित व्यवस्थेची कामे, पाणी मीटर वितरण बगीचा विकसित करणे, भंडारखाना बांधणे कामांसाठी दोन कोटी रुपये इतका निधी मंजूर आहे. त्याचप्रमाणे वडगाव नगरपरिषद क्षेत्रामध्ये भाजी मंडई विकसीत करण्यासाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर करणेत आला आहे. यामुळे वडगाव नगरपरिषदेच्या वैभवामध्ये आणखी भर पडणार आहे. तसेच हातकणंगले नगरपंचायतीसाठी विरंगुळा केंद्र, पोलीस वसाहत जवळ शौचालय, भूमी अभिलेख कार्यालय निवारा शेड, सभामंडप, मुस्लीम समाज कब्रस्थान निवारा शेड, सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये शेड व बैठक व्यवस्था कामांसाठी एक कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.
