सतत काही ना काही क्राईमच्या घटना या आपल्या कानी पडतच असतात. कुठे आत्महत्या तर कुठे अपघात या घटना तर सतत आपल्या कानी येतच असतात. तसेच अनेक मुलींना सासर होऊन खूपच जास्त देखील सहन करावा लागतो अनेक मुली याला बळी देखील पडतात तर पत्नीने माहेरहून पाच लाख रुपये न आणल्याने एकाने तिला सोडून मुंबई गाठली. तसेच तो प्रेयसीसोबत राहत असून आता परतणार नसल्याचा मेसेज त्याने पाठवला. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
रमण सातप्पा साबळे (रा.लक्ष्मी पेठ, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी अपर्णा रमण साबळे (वय ३६, रा. कोनापुरे चाळ, फॉरेस्ट बुद्ध विहारशेजारी, सोलापूर) हिने फिर्याद दिली आहे. २००८ मध्ये अपर्णा हिचा रमण याच्याशी विवाह झाला. लग्नानंतर रमण तिला सतत शिवीगाळ, मारहाण करत होता.
तसेच माहेरहून पाच लाख रुपये आण, अन्यथा माझ्याशी बोलू नको, असे तो म्हणाला होता. ११ एप्रिल रोजी त्याने मुंबईला जात असल्याचे सांगितले. त्यानंतर तो घरी न परतल्याने त्याच्या आईने पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.
त्याने अपर्णा हिच्या नातेवाइकांना मेसेज केला. आई, भाऊ, बहीण, पत्नी व मुलीसोबत राहायचे नाही. माझी सोय केली आहे. माझे दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. मी तिच्यासोबत राहत आहे. मी सोलापुरला परत येणार नाही, असे त्यात म्हटले आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक सचिन बनसवडे तपास करीत आहेत.