हातकणंगले मतदारसंघात राजकारण तापलं….

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजकीय वादळ घोंगावू लागलंय. या मतदार संघातील शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या विरुद्ध आता पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी शड्डू ठोकून उभे ठाकले आहेत.तर सदाभाऊ खोत यांनी देखील या जागेवर आपला दावा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं विशेष लक्ष लागलं आहे.

शेतकरी संघटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष या मतदारसंघाकडे असतं. मतदार संघात तीन तगडे उमेदवार आहेत. त्यामध्ये शिवसेना गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, एकेकाळचे राजू शेट्टीचे मित्र आणि सध्या रयत शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दावा केला आहे. तर शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून इच्छुक उमेदवार रोहित पाटील असे चार उमेदवार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात चौरंगी लढत लागण्याची शक्यता असल्यामुळे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या समोर मोठं आव्हान असणार आहे.